मुक्तसंचार गोठा यशोगाथा – सागर गावडे गुणवरे

डेअरीचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी खेडेगावातील तरुण हा खेडेगावातच रहावा यासाठी आम्हास असा सल्ला दिला कि दुध व्यवसाय आजकाल जे शेणाचा व्यवसाय म्हणून संबोधले जाते त्यामध्ये प्रतिष्टा राहिलेली नाही तर अश्या व्यवसायातील तृटी दूर करून या व्यवसायास जर प्रतिष्टा मिळवून दिली तर खेड्यातील तरुणाला शहरात जाऊन नोकरी शोधण्याची गरज पडणार नाही. याच विषयावर आम्ही काम चालू केले आणि  पशु व्यवस्थापनातील सर्वात अवघड काम म्हणजे शेण काढणे, जनावर रोज धुणे, गोठा साफ करणे यावर उपाय शोधणे महत्वाचे होते आणि या सर्व अडचणी मुक्तसंचार गोठा पद्धतीने संपुष्टात आल्याने आज तरूण वर्ग या व्यवसायाकडे एक शेणाचा व्यवसाय म्हणून न पाहता एक प्रतिष्टा असलेला व्यवसाय म्हणून पाहत आहे ही बाब आज विषद करणे महत्वाचे वाटते.

फलटण शहरापासून साधारणपणे १५ किमी अंतरावर गुणवरे म्हणून आहे. गावात जास्त बागायती जमीन असल्याने ऊस व मका ही या भागातील मुख्य पिके आहेत. याच गावातील श्री. सागर अप्पासाहेब गावडे हा कमी कमी भांडवलात अडचणीना घाबरून न जाता दुध उत्पादनाचा व्यवसाय उभा करून तरुणांनी शहरात जाऊन मिळेल ति नोकरी करण्यापेक्षा  खेडेगावातही प्रतिष्टा असलेला  दुध व्यवसाय कसा करावा हे दाखवून दिले असून. ज्या तरुणांकडे आज नवीन व्यवसाय करण्यासाठी भाग-भांडवल नाही असे तरूण सुद्धा आपली शास्रीय बुद्धी पणाला लावून कश्याप्रकारे दुध व्यवसायातून भरभराट करू शकतो याचे ज्वलंत उदाहरण आहे. सागर गावडे यांचे शालेय शिक्षण तसे आठवी पर्यंतच झालेले. वडिलोपार्जित सात एकर जमीन असून त्यातील चार एकर कालवा बागायत व ईतर ३ एकर चोपनयुक्त जमीन असून अनुत्पादित आहे. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे सागरला पुढील शिक्षण घेता आले नाही. काही दिवसा एका कंपनीत हंगामी नोकरीही केली परंतु त्यात काही मन रमत नसल्याने वडिलोपार्जित शेती व्यवसायातच लक्ष घालावयाचे ठरविले. वडील शेती करत असताना घरात दुध आसवे म्हणून दोन गाई होत्या. सागर हा कायम काही तरी नवीन करण्याचा प्रयत्नात असायचा आणि दोन गाई घेतल्या व व्यवसाय वाढवायचे ठरविले. असे करत त्याने गाईंची संख्या वाढविली. परंतु त्याला आता मुक्तसंचार गोठा पद्धतीचा अवलंब करावयाचा होता व त्यासाठी त्याच्याकडे भग-भांडवल नव्हते. होते ते सर्व पैसे मह्त्वाचे म्हणजे गाई खरेदी करण्यात घालवण्यात आले होते. बऱ्याच वेळेस दुग्ध संस्था दुध उत्पादकास थोड्या फार प्रमाणात अर्थ-सहाय्य करत असतात म्हणून तो डेअरीकडे अडव्हांस मागण्यासाठी आला त्यांनी सांगितले कि मला २० गाईंचा गोठा बांधकाम करावयाचे असून मला कमीतकमी एक लक्ष रुपये तर अडव्हांस म्हणून मदत करावी असे म्हणाला. आमच्यासाठी ही एक नामी संधी होती एक होतकरू तरूण आहे आणि  त्याला आधुनिक पशु व्यवस्थापन करावयाचे आहे. डेअरीला एका तरुणाला एक लक्ष अडव्हांस देणे अवघड नव्हते  परंतु अश्या किती तरुणांना आपण मदत करणार आहोत तसेच त्यापेक्षा आपण कमी खर्चातील गोठा व्यवस्थापन पद्धती जर विकसीत केली तर ग्रामीण भागातील हजारो तरुणांना हा एक संदेश असेल कि कमी भांडवल असले तरी आपण आपला व्यवसाय करू शकतो त्यासाठी थांबावयाची आवश्यकता  नाही.

अश्या परिस्थिती सागरला काही फोटो दाखविले कि या पद्धतीने जर तू मुक्तसंचार गोठा केलास तर तुला एक लक्ष रुपयांची गरज पडणार नाही व तुशे काम चालू होईल. त्याच्या अभ्यासू मनात हे विचार पटकन बसले व त्यांना आम्हास सांगितले कि आता तुमचे एक लक्ष रुपये नको परंतु तुम्ही आठ दिवसात गोठा पाहण्यासाठी मात्र आवश्य या. आमच्या मनातही याबाबत उत्कंठा होती त्यामुळे कधी आठ दिवस संपतील असे आम्हास वाटत होते. आणि ५ ते ६ दिवसातच सागरचा फोन आला कि उद्या तुम्ही गोठा पाहण्यास या. आम्ही हा गोठा पहायला गेल्यानंतर आमचा विश्वासच बसत नव्हता . सागरने फक्त घरची काही साहित्य व विकत आणलेल्या फक्त  रुपये ३५०० मध्ये २० गाईंचा प्रशस्त  मुक्तसंचार गोठा केला होता कि ज्यामध्ये जनावरांना आवश्यकतेनुसार सावली , बसायला मऊ जागा, ग्रुमिंग करायला ब्रश,  २४ तास पाणी व चाऱ्याची व्यवस्था ई. सर्व व्यवस्था या गोठ्यात केलेली होती. त्याने संगीतले कि माझ्या गोठ्याचे आपण इस्रायेलच्या गोठ्याशी तुलना करू. त्यांच्याकडे भली मोठी शेड असतात व उन्हाच्या / सावलीच्या गरजेप्रमाणे हे स्वयंचलीत पत्र्यांची हालचाल होते. त्याप्रमाणे आपणाकडे भलेमोठे आंब्याचे झाड आहे व या झाडाखाली जनावरे पाहिजे त्यावेळेस बसतात तर पाहिजे त्यावेळेस उन्हात जातात. त्यांच्याकडे एक एक लक्ष रुपयांचे ग्रुमिंग ब्रश आहेत तर आम्हीही दोनशे रुपयात लाकडाला काथ्या बांधून ब्रश तयार केला आहे. त्यांच्याकडे जनावरांना बसण्यासाठी गाद्या असतात तर आपणाकडे भरपूर प्रमाणात मिळणारी पाचट यात टाकली आहे त्यामुळे जनावरे अगदी निवांत बसू शकतात. आता अश्या गोठ्यात एक अडचण राहिली होती ति म्हणजे बहरून चारा टाकण्यासाठी

आकृती:- श्री.सागर गावडे यांनी कमी ख्रार्चात तयार केलेली बर्दांची गव्हाण

गव्हाण असणे होय. सागर पुन्हा वीस हजारच्या अडव्हांस मागणीसाठी आला व म्हणाला गव्हाण करवयाची आहे. आम्ही त्याला पुन्हा काही फोटो दाखविले व पटवून सांगितले त्यांनी घरी जाऊन तिसऱ्या दिवशी ६०० रुपयात २० गाईंची गव्हाण तयार केली. अश्या प्रकारे सागरने युवकांसाठी एक आदर्श घालून दिला कि आज आपण खेडे गावठी आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या साधन सामुग्रीचा वापर करून आधुनिक पद्धतीचा कमी श्रमाचा व अधिक उत्पादन देणारा मुक्तसंचार गोठा करू शकतो.

यानंतर सहा महिन्याने आम्ही सागरला विचारले कि आता तुझ्याजवळ जमा झालेल्या पैशातून तू आता चांगला गोठा तयार कर परंतु यावर त्याची प्रतिक्रिया वेगळी होती. तो म्हणाला कि आपल्या बऱ्याच व्याख्यानामध्ये तुम्ही असे सांगितले आहे कि जनावराचे पोट हे खरे तर चारा पचवण्यासाठी असते परंतु आपल्या जनावरांना आपण चांगल्या गुणवत्तेचा चारा पुरवठा करू शकत नाही म्हणून म्हणून आपणास या पशुखाद्याचा आधार घ्यावा लागतो.  जास्तीत जास्त रासायनिक खते व औषधे यांच्या अतिरेकी वापरामुळे आपल्या शेतीची गुणवत्ता कमी होत चालली असून त्यातून तयार होणारा चाराही कमी गुणवत्तेचा तयार होत आहे. याठिकाणी एक म्हण सुचते ति म्हणजे आडतच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार ही होय. त्यासाठी आपल्या जमिनीची सुपीकता वाढवली तर आपणास चांगल्या गुणवत्तेचा चारा मिळेल. हेच ओळखून सागरने आपल्याकडे शिल्लक असलेल्या पैशातून तलावातील सुपिक माती आपल्या दीड एकर जमिनीत आणून टाकली. त्यामुळे आता चांगल्या गुणवत्तेचे चारा उत्पादन ते आता घेऊ शकतात. या पुढे सागरने हायड्रोपोनिक  चारा उत्पादन , अझोला उत्पादन , मुरघास असे अनेक कमी खर्चातील प्रयोग करून स्वतःच्या कष्टाने आज या पातळीवर आहे कि जो तरूण नोकरीसाठी वणवण फिरत होता तोच आता २-३ तरुणांचा आधार बनू पाहत आहे. ही आजची सर्वात महत्वाची गोष्ट आदर्श म्हणून खेड्यातील तरुणापुढे आहे.

श्री. सागर गावडे गुणवरे

दुग्धव्यवसायक ​