जंत आणि जंतनाशक याविषयी महत्वाची माहिती

जंत किती प्रकारची असतात आणि जंतनाशक यांचा वापर केव्हा व कसा करावा याविषयी थोडक्यात माहिती
लेखक : डॉ. आरिफ शेख B.V.Sc. & A.H.), मो.९९२२६२२६०८
पशुवैद्यकीय चिकित्सक, मु. पो. साकुर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर
Worm and Insecticide
 
 • जंत हे तीन प्रकारचे असतात. गोलकृमी, पट्टकृमी आणि चपटेकृमी.
 • जंत आतडे, फुप्फुस, यकृत, पोटाचा कप्पा, डोळे व नाकपुड्या यांत आढळून येतात. काही जंत हे गाभणकाळात गर्भपिशवीद्वारे नाळेच्या माध्यमातून वासराच्या पोटात जाऊ शकतात.
 • जंतामुळे निमोनिया, कावीळ, हगवण, जबड्याखाली सुज येणे, अशक्तपणा, सतत शिंका व खोकला, डोळ्यातून सतत पाणी येणे व गर्भपात अशी लक्षणे दिसून येतात.
 • जंतामुळे जनावराची प्रतिकारशक्ती कमी होते व ते इतर आजाराला सहज बळी पडतात. त्यांचे उत्पादन घटते आणि म्हणून अशा वेळी जंतनाशक औषध देणे गरजेचे ठरते.
 • काही जंतनाशके ही मर्यादीत व्याप्तीची असतात…म्हणजे ती ठराविक जंतावरच प्रभावी ठरतात. अशी औषधे वापरण्यासाठी योग्य निदान होणे, गरजेचे असते. जे फक्त नोंदणीकृत पशुवैद्यक करू शकतात.
 • काही जंतनाशके ही व्यापक व्याप्तीची म्हणजेच एकापेक्षा जास्त प्रकारच्या जंतावर प्रभावी असतात. ज्यावेळेस एकापेक्षा जास्त जंतांचा प्रार्दुभाव असेल, तेव्हा यांचा वापर करावा लागतो.
 • काही जंतनाशके ही फक्त अंडे नष्ट करतात तर काही प्रौढ व पुर्ण वाढ झालेल्या जंतावर प्रभावी असतात.त्यामुळे संपुर्ण निर्मुलन करण्यासाठी पशुवैद्यकांचा सल्ला महत्वाचा ठरतो. अन्यथा औषधे देऊनही परत प्रार्दुभाव आढळून येतो.
 • प्रत्येक जंतनाशक यांचे काही साईड इफेक्टस पण असतात. माहिती नसताना व प्रार्दुभाव नसताना उगाच जंतनाशक औषध देऊ नये. त्याने यकृतावर गंभीर परिणाम होतात. जनावराची भुक मंदावते. गर्भपात, व्यंग निर्माण होणे, चक्कर येणे, जुलाब होणे, आंधळेपणा, दृष्टी कमजोर होणे, उलटी होणे आणि मृत्यु असे नकोसे परिणाम दिसून येतात.
 • जंतनाशक देण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. काही औषधे थेट तोंडाद्वारे पोटात दिली जातात तर काही इंजेक्शद्वारे देता येतात. इंजेक्शद्वारे देताना जर मार्ग चुकला तर दुष्परिणाम दिसून येतात.
 • या सर्व बाबी विचारात घेता सुरक्षित औषधांची निवड,योग्य मात्रा आणि मार्ग व संपुर्ण निर्मुलन यासाठी नोंदणीकृत पशुवैद्यक यांच्या सल्ल्यानेच जंतनाशक औषध देणे, दुध उत्पादक यांच्या हिताचे आहे.
 • अनावश्यक व जास्त मात्रेत जंतनाशक यांचा वापर वाढल्याने औषधांना ‘प्रतिरोधकता’ वाढत आहे. जी भविष्यात फार मोठी डोकेदुखी ठरणार आहे. त्याला रोखण्यासाठी दुध उत्पादक, पशुवैद्यक आणि औषध निर्माण व वितरीत करणाऱ्या समूहाला जागृत राहणे गरजेचे आहे व आचारसंहिता पाळणे क्रमप्राप्त आहे.
 1. लकीराज पवारOctober 5, 2018 at 2:16 pm

  उपयुक्त माहिती

  Reply

  1. आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद सर.

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*