आपणास माहित आहे का …. गायींना बांधने हा एक क्रूर प्रयत्न आहे !!!!!

नैसर्गिकरित्या गायींना समूहा मध्ये राहायला आवडते आणि त्यातच त्या शांत राहतात. त्यांचा अधिकतम वेळ रवंथ करण्यात आणि आरामात जातो त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा तणाव नसतो आणि ते त्यांच्यासाठी लाभदायक आहे.

Cow

नैसर्गिकरित्या गायींना समूहा मध्ये राहायला आवडते आणि त्यातच त्या शांत राहतात. त्यांचा अधिकतम वेळ रवंथ करण्यात आणि आरामात जातो त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा तणाव नसतो आणि ते त्यांच्यासाठी लाभदायक आहे.  

Cow

चांगल्या आरोग्यासाठी आणि दुधाचे अधिक चांगले उत्पादन करण्याच्या दृष्टीने, गायीने किमान ६ – ८ तासांपर्यंत रवंथ करणे आणि सुमारे १२ तास शिथिल असावे. बरेच  शेतकरी आपल्या गायीला दोरीने बांधून ठेवतात. अशा परिस्थितीत, प्राणी रवंथ करण्यासाठी आरामात बसू शकत नाहीत आणि खाली पडून विश्रांती ही करू शकत नाही. 

स्वच्छ दूध देण्याकरता गाय स्वच्छ जमिनीवर बसणे आवश्यक आहे पण दिवसाचा जास्त वेळ बांधलेली असल्यामुळे तिला तिथेच संडास व लघवी करावी लागते आणि त्याच घाण जागेवर बसावे लागते. हे गायींमध्ये दिसणाऱ्या कासेचे आणि गर्भाशयाच्या संक्रमणांचे प्रमुख कारण आहे. 

जर आपण रक्तात असलेल्या कॉर्टिसॉल चे प्रमाण बघितले तर असे दिसून येते कि बांधल्या मुळे गायींवर तणाव वाढतो आणि त्या आक्रमक वागू लागतात. विशेष म्हणजे शेतकरी मानतात की गायी आणि बैलांना बांधून ठेवला पाहिजे कारण हे आक्रमक वागतात आणि लढू शकतात. त्याउलट असे दिसून येते की, ज्या गायी दिवस रात्र मोकळ्या राहतात त्या अधिक प्रेमळ असतात. 

जेव्हा आपण गायीं मुक्त ठेवता तेव्हा ते जबरदस्तीने लैंगिक वर्तणूक व्यक्त करू शकतात म्हणून जनावरांमध्ये माज शोधणे सोपे आणि प्रजनन वाढते. ज्या गायी मुक्त आहेत ते व्यवस्थित बसू शकतात आणि रवंथ करण्यासाठी अधिक वेळ देतात जे चांगल्या पाचन सह खाद्यांचा अधिकतम वापर करते. अशा गायी दुग्धोत्पादन आणि गुणवत्ता सुधारतात. स्वच्छ गृह व्यवस्था गायींसाठी उत्तम आहे. असे आढळून आले की अश्या व्यवस्थाचे पालन करणारे शेतकरी अधिक नफा मिळवीत आहेत आणि यामुळे गायींच्या आरोग्याला बढावा मिळेल व् रोगाचे प्रमाण कमी होईल.

गायींना दोन तास ही बद्ध करता कामा नये कारण तणावाचे प्रमाण जास्तीत जास्त वाढेल. हे भारतामध्ये सामान्य रीती आहे आणि आपण सर्वांनी ते टाळावे. जर बांधण्याची वेळ आलीच तर दोरी ची लांबी कमित कमी ९ मीटर असली पाहिजे.  जेणेकरून त्यांना व्यवस्थित बसण्यास मदत होईल आणि त्यांची  तणाव पातळी कमी राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*