चारा कमतरतेवर उसाच्या वाड्याच्या मुरघासाची मात्रा

एकूण खर्चाच्या ६० ते ७०% खर्च हा आहारावर होत असतो. दूध उत्पादन खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार खर्चावर लक्ष देणे गरजेचे आहे.

१ किलोपुरवठ्यासाठी  लागणारा खर्च (रु.)हिरव्या चार्‍यातून होणारी बचत
पशुखाद्यहिरवा चारा  
प्रथिने९४.४४५५.५५४१.१८ %
पचनीय आहार२६.९८११.६०४२.९९ %

वरील तक्त्यावरून हे स्पष्ट होते, की पशुखाद्य कमी करून हिरव्या चाऱ्यावर अधिक भर देणे फायद्याचे आहे. तथापि, हिरव्या चार्‍याची कमतरता हा एक मोठा वास्तविक प्रश्न आहे. त्यामुळे एरवी वाया जाणार्‍या, मात्र सहज उपलब्ध होणार्‍या धान्य पिकांच्या अवशेषांचा जनावरांच्या आहारात वापर करून घेतला पाहिजे. यातील महत्वाचे म्हणजे उसाचे वाडे होय.

उसाचे वाडे

उसाचे उत्पन्न घेतले जाते अशा भागात जनावरांच्या आहारात ऊस व उसाच्या वाड्याचे प्रमाण जास्त आहे. वाडे जनावरांना खायला दिले, तर त्यामध्ये असणाऱ्या ऑक्झॅलेटचा दूरगामी परिणाम जनावरांच्या उत्पादन क्षमता, आरोग्य व प्रजननक्षमतेवर होत असतो. परंतु त्यातून मार्ग काढण्यासाठी मुरघास ही फार महत्वाची पद्धत आहे.

कसा कराल उसाच्या वाड्याचा मुरघास 

उसाच्या वाड्यात अन्नघटकांचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते. त्यासाठी आपण मुरघास करताना अधिक अन्नघटक देण्यासाठी काही घटक समाविष्ट केले तर आपण आपल्या जनावरांना चांगला आहार देऊ शकतो. तीन पद्धतींनी  हा मुरघास केला जावू शकतो.

 • साधा मुरघास
 • मळी मिसळून
 • मळी व युरिया मिसळू
 • पाण्याचे प्रमाण:- सर्वसाधारणपणे वाड्यात पाण्याचे ८०% ते ८५% प्रमाण असते. दुसऱ्या दिवशी ते         ७०% पर्यंत असते. मुरघास चांगला होण्यासाठी आपणास चाऱ्यातील पाण्याचे प्रमाण किमान ६५% ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे आज आणलेले वाढे आपण दुसऱ्या दिवशी मुरघासास घेऊ शकतो.
 • साठवण :- उपलब्ध असणारे वाडे व्यवस्थितपणे उभे करून ठेवावे. एकावर एक टाकले तरत्यामधील ऊर्जा कमी तर होतेच, पण बुरशीचे प्रमाण वाढून त्यात काही अनावश्यक घटकांचे – अफ्लाटॉक्सिनचे – प्रमाण वाढते व मुरघासाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. 
 • कुट्टी झाल्यांनतर पिशवीत किंवा पिट मध्ये प्लास्टिक कागद अंथरावा. त्यावर  हिरवा चारा थरावर थर दाबून भरावा. एक थर झाल्यांनतर व्यवस्थितपणे जास्तीत जास्त हवा बाहेर काढण्यासाठी दाबावा. (पिशवीत असेल तर माणसाच्या सहाय्याने किंवा मोठ्या पिटमध्ये असेल, तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने.)
 • कोणते मुरघास मिश्रण टाकावयाचे असेल, तर चाऱ्याच्या वजनाच्या प्रमाणात मिश्रण टाकावे.
 • (पावडर किंवा द्रव पदार्थ कमी प्रमाणात टाकावयाचा असेल तर सर्वसाधारणपणे १०ते १२ किलो कुट्टी घेऊन त्यात असे मिश्रण टाकावे व व्यवस्थितपणे चारा हलवून आपण टाकलेले मिश्रण व्यवस्थितपणे सर्व ठिकाणी एकसारखे मिसळले असेल, तर असा मिश्र चारा त्या थरावर टाकावा. त्यामुळे आपणास टाकावयाचे मिश्रण सर्व भागात एकसारख्या प्रमाणात पसरण्यास मदत होते.)
 • कुट्टी:- वाड्याची कुट्टीयंत्राने कुट्टी करून घ्यावी. त्यासाठी सर्वसाधारणपणे पाउण ते सव्  इंच लांबीची कुट्टी करून त्याचा आपण मुरघास करू शकतो. (कुट्टी जास्त लहान केली, तर जनावरांना रवंथ करण्यासाठी अडचण होऊ शकते. जास्त मोठी झाली, आवश्यक त्या प्रमाणात चारा हवामुक्त करता येणार नाही.)

  • सोयीनुसार खालील प्रकारे मुरघास करता येतो.
  • लहान  पिशवी
  • मोठी पिशवी
  • जंबो पिशवी
  • खड्ड्यातील मुरघास
  • बॅरल मुरघास
  • जमिनीवरील मुरघास
  • कुट्टी झाल्यांनतर पिशवीत किंवा पिट मध्ये प्लास्टिक कागद अंथरावा. त्यावर  हिरवा चारा थरावर थर दाबून भरावा. एक थर झाल्यांनतर व्यवस्थितपणे जास्तीत जास्त हवा बाहेर काढण्यासाठी दाबावा. (पिशवीत असेल तर माणसाच्या सहाय्याने किंवा मोठ्या पिटमध्ये असेल, तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने.)
  • कोणते मुरघास मिश्रण टाकावयाचे असेल, तर चाऱ्याच्या वजनाच्या प्रमाणात मिश्रण टाकावे.
  • (पावडर किंवा द्रव पदार्थ कमी प्रमाणात टाकावयाचा असेल तर सर्वसाधारणपणे १०ते १२ किलो कुट्टी घेऊन त्यात असे मिश्रण टाकावे व व्यवस्थितपणे चारा हलवून आपण टाकलेले मिश्रण व्यवस्थितपणे सर्व ठिकाणी एकसारखे मिसळले असेल, तर असा मिश्र चारा त्या थरावर टाकावा. त्यामुळे आपणास टाकावयाचे मिश्रण सर्व भागात एकसारख्या प्रमाणात पसरण्यास मदत होते.) 
 • मिश्रण:-  यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मिश्रणे टाकू शकतो.

 •  मुरघासाची गुणवत्ता आधी चांगली होण्यासाठी आवश्यक किण्वन प्रक्रिया वाढविणारी मिश्रणे (किण्वन प्रक्रिया वाढविणारे जीवाणू)
 • अन्नघटकांची वाढ करण्यासाठी आवश्यक असणारी मिश्रणे होय. (मळी , युरिया).
 • थरावर थर पूर्ण झाल्यांनतर प्लास्टिकचा कागद हवाबंद होईल या पद्धतीने बंद करून घ्यावा व त्यावर वजन ठेवावे.
 • अशा प्रकारे हवाबंद स्थितीत हा चारा ४५ दिवस ठेवायचा असतो व त्यानंतर गरजेप्रमाणे जनावरांना हा तयार मुरघास खायला द्यावा.

उसाचे वाड्याच्या मुरघासाचे  फायदे

 • मुरघासाच्या माध्यमातून चारा त्याच्यातील अन्नघटकांसह साठवून तो गरजेनुसार वापरता येतो. (ऊस कापणी दरम्यान एकदम जास्त उपलब्ध होणारे वाडे लगेच वापरले जावू शकत नाहीत. दुसर्‍या बाजूला वाळल्यामुळे त्यातील अन्नघटक व गोडी कमी होते.)
 • मुरघासातील किण्वन प्रक्रियेमुळे उसाच्या वाड्यातील कर्बोदक पचनक्षमता वाढते.
 • प्रथिने जास्त प्रमाणात उपलब्ध होतात.

  मुरघास केल्यामुळे वाड्याची गोडी वाढते व जनावरे आवडीने खातात. वाड्यामधील ऑक्झॅलेटचे प्रमाण कमी होते व त्यामुळे होणारे अपाय टाळले जातात. बाह्य मिश्रणे टाकून वाड्याची गुणवत्ता वाढवता येते.  जिवाणूंच्या मदतीने चाऱ्याची किण्वन प्रक्रिया होते व त्यामुळे पचनक्षमता वाढते.

   उसाच्या नुसत्या वाड्यातील आणि मुरघास केल्यानंतर अन्न-घटकांची तुलना 

घटकउसाचे वाडेउसाच्या वाड्याचा मुरघास
शुष्क %२८.५३२.१
प्रथिने %५.६७.२
तंतुमय पदार्थ %३३३४
इथर एक्स्ट्रक्ट१.४१.३
राख %७.२
नायट्रोज फ्री एक्स्ट्रक्ट५१.०५४८.७
केल्शियम०.३०.४
पालाश०.१०.४
सामू

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*