मिलकिंग मशीन ची निवड

मिलकिंग मशिन घेताना नेमक्या काय बाबी समजून घ्याव्यात आणि चांगल्या दर्जाची मशिन कशी ओळखावी, यासाठी खास तज्ञांकडून मार्गदर्शन.

मिलकिंग मशीन ची निवड कशी करावी ?

मिलकिंग मशीन कोणती घ्यावी ह्यावर कधी कुठेही चर्चा होत नाही कारण उत्पादकाला तो सर्वात सोपा विषय आहे असं नेहमी वाटत आलं आहे. मिलकिंग मशिन खरेदी केल्यावर आहे तसं ते मशीन वापरत राहतात, त्या मशीन मधील पार्टस ची पण त्यांना माहिती नसते व त्याची कार्यपद्धत कशी असावी याचा ही अभ्यास नसतो कारण तो कुठे लिखाणात किंवा वाचनात आलेला नाही.

उत्तम प्रकारच्या मिलकिंग मशीन चा वापर केल्यास ज्याची कार्यपद्धत गाई किंवा म्हशीसाठी ‘ज्या प्रमाणे वासरू दूध पित आहे असं अनुभव देते’ ती मशीन खऱ्या अर्थाने उत्पादकला वरदान ठरते नाहीतर तेच मशीन शाप ही ठरु शकते.

जास्त दूध उत्पादन करून अधिक नफा मिळावा या सिद्धांतावर सगळे 365 दिवस राबतात, त्यासाठी जास्ती जास्त चांगली गाई निवडतात, तज्ज्ञ चा सल्ला घेतात, त्यासाठी मॅट वापरतात कारण तिला आराम मिळावा व ती अधिक दूध उत्पादन करू शकेल, सर्वात महाग पशुखाद्य चारतात पण ज्या वेळेस खरं उत्पन्न कमवायची वेळ येते म्हणजे दूध काढायची त्या वेळेस मिलकिंग मशीन ची निवड करताना “किंमत” ह्या एकमेव निष्कर्ष वर उत्पादक जास्त भर देतो.

किंमत ही महत्त्वाची आहे ह्यात दुमत नाही पण सर्वात महाग मिलकिंग मशीनची निवड फक्त 20% उत्पादक करतो बाकी 80% हे सर्वात स्वस्त मशीन ची निवड करतात ही वस्तूस्थिती आहे आणि त्या निर्णय नंतर उत्पादकाची ताळेबंद वही तयार होते, त्यात नेहमीच उतार दिसत येतो कारण उत्पन्न म्हणचे ‘जनावरांच्या स्तनातून संपूर्ण दूध काढण्याची क्षमता’ त्या स्वस्त मशीन मध्ये नसते हे उत्पादकाला ही अनुभवास येते पण वेळ निघून गेलेली असते आणि पुन्हा नवीन मशीन घेणे शक्य होत नाही.

असाच आपला व्यवसाय ओढत उत्पादक थकून जातो, मशीन वर होणारे खर्च, अर्धवट दूध काढल्यामुळे होणारे आजार, जनावरांची उत्पादन क्षमता घटणे आणि ह्यात दुधाचे दर त्यामुळे कंबरडे मोडून निघते आणि उत्पादक म्हणतो धंद्यात काही शिल्लक राहत नाही फक्त शेणच पदरात पडतंय…

ह्या सर्वातून सुटका करून घेण्यासाठी आणलेल्या जनावरांच्या सडातून संपुर्ण दूध योग्य वेळेत काढणे अति महत्वाचे आहे कारण जर हे शक्य झालं तर दूध उत्पादन मध्ये वाढ होते असे संशोधन NDRI, कर्नाल ह्यांनी केलं आहे.

मिलकिंग मशीनचे योगदान यात महत्वाचे आहे म्हणून योग्य मशीनची निवड अतिमहत्वाची आहे .

 मशीन मध्ये 3 प्रमुख पार्टस आहे

१) व्हॅक्युम पंप

२) व्हॅक्युम रेग्युलेटर

३) पल्सेटर

१) व्हॅक्युम पंप :

निर्वात पोकळी म्हणजे व्हॅक्युम हे आपणास सर्वांना माहीत आहे. सिस्टिम मध्ये निरंतर निर्वात पोकळी निर्माण करणे हे पंपचे कार्य आहे. क्लस्टर सडाला लावल्यावर सडातून दूध ओढण्यासाठी आवश्यक व्हॅक्युम सतत तयार करत राहणे व जेव्हा क्लस्टर सडातून काढले जाते दुसऱ्या जनावराला लावण्यासाठी; त्या वेळेस सिस्टिम मध्ये हवा शिरते व व्हॅक्युम ची पातळी खालावते ही पातळी 30 सेकंदात पुन्हा पुर्वरत करण्याची क्षमता चांगल्या प्रतिच्या पंप मध्ये राहते.
पंप ची कार्यक्षमता ही लिटर पर मिनिट ( LPM) मध्ये मोजली जाते. एका बकेटला पुर्ण मिलकिंग करण्यासाठी कमीत कमी 80 LPM ची आवश्यकता असते. निवड करताना आपल्याला किती बकेट चालवायचे आहे, त्याचा अभ्यास करून पंप निवडावा नाही तर अनेक कंपनी जास्त LPM च आमिष दाखवतात व उत्पादकाची दिशाभूल करतात आणि त्यामुळे योग्य निर्णय घेता येत नाही.

२) व्हॅक्युम रेग्युलेटर

हा मिलकिंग मशीनचा मेंदु आहे. ज्या प्रमाणे मानवी शरीरात मेंदुचे स्थान अव्वल आहे, त्याप्रमाणे मशीन मध्ये याचे देखील अतिमहत्त्वाचे स्थान आहे कारण पंप निरंतर व्हॅक्युम तयार करत राहणार पण सडापर्यंत आवश्यक तेवढेच व्हॅक्युम निरंतर ठेवणे हे रेग्युलेटर चे मुख्य कार्य आहे. एकदा निश्चित केलेल्या प्रेशर वर न बदलता मिलकिंग करत राहणे हे एका चांगल्या प्रतीच्या मशीनची ओळख आहे. वारंवार प्रेशर मध्ये बदल होणे व हाताने पुन्हा तो सेट करणे हे जनावरांना अपायकारक आहे.
अनियमित प्रेशर मुळे मस्टायटीस होऊ शकतो, सडाच्या आतील keratin चे कवच नष्ट होऊ शकते त्यामुळे सडाची उघड- बंद क्रिया मंदावते, सडाच्या मुखाला गोलाकार रिंग तयार होते.

३) पल्सेटर

हे मशीनचे हृदय आहे. एका मिनिटमध्ये किती ठोके पडले पाहिजे आणि त्या एक ठोक्या मध्ये किती वेळा दूध ओढले गेले पाहिजे आणि किती वेळा सडा भवती मसाज केले गेले पाहिजे जेणे करून जनावराला आपलं वासरू दूध पित आहे असा अनुभव मिळणे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. संशोधकांनी अभ्यास करून काही मापके ठरवली आहे, जे जनावारांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे आहे.
ISO 5707 ह्या नुसार एक मिनिट मध्ये कमीत कमी 55 आणि जास्तीत जास्त 65 ठोके पडले पाहिजे, ज्याला आपण पलसेशन रेट असं म्हणतो त्यात पेक्षा कमी व जास्त झाल्यास दूध पुर्णपणे निघणार नाही व क्लस्टर काढल्यावर पुन्हा हाताने दूध काढावे लागेल म्हणून ठोके नियमित राहिल्यावर संपुर्ण दूध काढणे सहज शक्य आहे आणि त्यामुळे जनावरांची उत्पादन क्षमता ही वाढण्यास मदत होते परंतु आज बाजारात जे स्वस्त मशीन मिळतात त्या मध्ये जे पल्सेटर वापरले जातात त्या मध्ये खाली एक स्क्रू दिला जातो कारण ते नेहमी आपली निश्चित केलेल्या मापकाप्रमाणे चालत नाही कधी वाढवून ठोके ऐकायला मिळतात तर कधी खूप कमी म्हणून तो स्क्रू दिला जातो.
उत्पन्न वाढवायचं असेल तर स्क्रू नसलेले पल्सेटर पहा व त्या मशीन विकत आणा. पल्सेटर हृदय असल्यामुळे त्याचे ठोके नियमित असायलाच हवे नाहीतर नुकसान तर फक्त उत्पादकाला सोसावे लागणार.

या बरोबर क्लस्टरची भुमिका ही नाकारता येत नाही. हे सगळे पार्ट एकमेकांच्या सहाय्याने जनावरांच्या सडातुन संपुर्ण दुध ओढून काढण्यास कारणीभूत ठरतात. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो क्लस्टर लावताना दोन माणसांची गरज भासते कारण त्याची रचना मुळात चुकीची केली आहे, हे उत्पादक मशीन विकत घेताना पाहत नाही कारण त्याला हे पहिल्या दिवशी बिंबवले जाते की दोन माणसे लागतातच. शिवाय अपूर्ण दूध निघणे; क्लस्टर काढल्यावर पुन्हा हाताने दूध काढणे हे तोटे आहेतच. क्लस्टरचे वजन मात्र कमीत कमी म्हणजे 100 – 150 ग्राम असेल तर ठीक आहे परंतु ह्या पेक्षा जास्त असेल तर ते उत्पादकाच्या फायद्याचे नाही. बाजारात मिळणाऱ्या जास्त मशीनमध्ये हे अवगुण आढळतात म्हणून उत्पादक ने मशीन निवडण्या अगोदर तिच्या दराची चौकशी न करता तिच्या कामगिरीची चौकशी प्रत्यक्ष एखाद्या फार्मला भेट देऊन मिलकिंग करत असताना निरक्षण करणे गरजेचे आहे.

सर्व्हिस आणि मेंटेनन्स

मिलकिंग मशिन वापरत असताना त्याला होणार वार्षिक मेंटेनन्सचा खर्च ज्या मध्ये स्पेअर पार्टस तुटणे, रबर लायनर फाटणे वगैरे… या खर्चाचा सुद्धा मशीन घेण्यापुर्वी उत्पादकाने अभ्यास करून घ्यावा. जास्तीत जास्त रबर लायनर चा खर्च व्हायला पाहिजे, ते प्रत्येक 6 महिन्यानंतर बदलून टाकणे महत्वाचे आहे. लायनर तुटेपर्यंत वापर करणे चुकीचे आहे म्हणून अशी मशीन निवड करावी ज्यावर वार्षिक खर्च लायनर व्यतिरिक्त काहीही नसावा.
सर्व्हिस जवळ आहे हे पाहून ही बरेच उत्पादक आपल्या गावातील मशीन घेतात. पण हा विचार करून का घेत नाहीं की मशीन ला कमी सर्व्हिस लागली पाहिजे आणि लागलीच तर ती उत्पादकाला स्वतः हाताळता आली पाहिजे, जेणेकरून दुसऱ्यावर अवलंबुन राहण्याची वेळ येणार नाही.

श्री.आलीम शेख

9511210192

डॉ.आरिफ शेख

9922622608

सुचना : रिलायेबल डेअरी इक्युपमेंट्स: श्री.आलीम शेख हे मिलकिंग मशीन तज्ञ असून त्यांना DeLaval या कंपनीचा विक्री अनुभव आहे आणि स्वतः मशीन बनवितात तर डॉ.आरिफ शेख हे अनुभवी तज्ञ पशुवैद्यक आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*