आपण गायींना चाऱ्या ऐवजी ऊस देऊ शकतो का ?? किती द्यायला पाहिजे

परंपरागत चारा मिळत नसलेल्या परिस्थितीत ऊस गायींना दिला जाऊ शकतो. उपलब्ध खाद्य चाचणी माहिती वरून, दररोज १० ते १२ किलो दूध देणाऱ्या गायींचे पालनपोषण करणाऱ्या शेतक-यांना खालील आहार धोरणांची शिफारस केली जाते.

१९७० मध्ये गायींना चाऱ्या ऐवजी ऊस देण्यास सुरुवात झाली आणि सुरुवातीस उन्हाळी हंगामातच त्याचा वापर करण्यात आला. हळू हळू भारत आणि अमेरिकेत लोक चारा देण्या ऐवजी ऊसच देऊ लागले. बऱ्याचदा हे लक्षात आले आहे की शेतकऱ्यांना गायींचे अन्न आणि खाद्यात पुरविल्या जाणाऱ्या  पोषणा बद्दल माहीती नसल्यामुळे ते अजाणतेपणी चालू असलेल्या चुकीच्या प्रथांचा अनुकरण करतात यामुळे गायींच्या तब्बेतीवर वाईट परिणाम होतो.

           सर्वप्रथम, हे समजणे महत्त्वाचे आहे की जर आपण इतर चारा ऐवजी गायींना फक्त ऊस दिले तर नुकसान होऊ शकते आणि पशुवैद्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या शेतकऱ्यांना ही माहिती द्यायला हवी.   

जास्त दूध देणाऱ्या गायींना ऊस देऊ नये, विशेषत: जेव्हा त्या दूध देण्याच्या कमाल टप्प्यामध्ये असतात. गाईच्या आहारात ऊसाचा वाटा ४० ते ४५ टक्केपेक्षा अधिक असू नये. दुधात प्रथिने वाढवण्यासाठी सोयाबीन आणि युरिया (१० ग्राम / कि.ग्रा. पोषक आहार) दिला जातो जेणे करून आपल्याला दूधामध्ये प्रथिने जास्त भेटू शकतात. जर लुसर्न गवत असेल तर यूरिया देण्याची गरज नाही. ऊसामध्ये प्रथिने कमी आणि फायबर्स जास्त प्रमाणात असल्यामुळे उसाचा उपयोग कमी दर्जाच्या चाऱ्याचा स्वरूपात केला जातो. 

क्युबामध्ये “सैखरीना” नावाखाली एक उत्पादन उपलब्ध आहे, ज्यात १४ टक्के कच्चे प्रथिने आणि ९० टक्के डीएमचा समावेश असतो. ते १ टन चिरलेल्या ऊस आणि १५ किलो युरीया आणि ५ किलो खनिज जोडून तयार करतात. नंतर मिश्रण विक्रीपूर्वी सुकवले जाते.

शेतक-यांना शिक्षित करण्याची गरज आहे जेणेकरून त्यांना समजू शकेल की सुयोग्य आहार रूमेन मायक्रोफ्लोराला आधार देण्यासाठी प्रथिने, खनिजं आणि जीवनसत्वे यांच्या पूरकतेमुळे दुष्परिणामांवर मात करता येते, हा ऊसाचा प्रतिकूल परिणाम कमी करू शकतो. एक महत्वाचे तत्व असे आहे की जर गायींच्या आहारामध्ये ऊस असेल तर रूमेन मायक्रोफ्लोराला पोषक नायट्रोजन (अमोनिया, युरिया) आणि पोषक घटकांची ट्रेस (पेप्टाइड्स, एमिनो एसिड, खनिज आणि जीवनसत्वे) देण्यात यावा.

Can Sugarcane be Fed to Cattle

युरिया २ – ३  टक्के पोषक किंवा खाद्य धान्याच्या भागापेक्षा अधिक दराने खाऊ नये आणि ते एकूण फीडच्या १% पेक्षा कमी इतकेच मर्यादित असावे. काही देशांमध्ये दर टन ऊस मध्ये १० कि.ग्रा. यूरिया टाकला  जातो आणि खनिजे, जीवनसत्त्वे आणि प्रोपियोनेटसह आहार तयार केला जातो. जेव्हा युरियाचा समावेश केला जाईल तेव्हा सावधगिरीची एक सूचना; टप्प्याटप्प्याने यूरियाच्या पातळीत वाढ करा हे रूमेन मायक्रोफ्लोराला एनपीएन वापराशी जुळण्यास सक्षम करण्यासाठी मदत करते.

सल्ला

जेव्हा परंपरागत चारा मिळत नाही त्या परिस्थितीत मध्यम दूध उत्पादन क्षमता असणाऱ्या गायींना उस देऊ शकता  परंतु आहाराला संतुलित करने अत्यंत  आवश्यक आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*